हुतात्मा बाबुराव बोरगांवकर, हुतात्मा निलय्या स्वामी यांना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडून आदरांजली
नळदुर्ग शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात हुतात्मा स्मृती मंदिर व हुतात्मा चौक याठिकाणी हुतात्मा बाबुराव बोरगांवकर हुतात्मा निलय्या स्वामी यांना गावातील नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शनिवार दि.०१ मार्च रोजी हुतात्मा दिनानिम्मित शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालातील हुतात्मा पुतळ्यास बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व हुतात्मा पुत्र बाबूराव स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.
. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव प्रकाशराव चौगुले, शहबाज काझी , प्रदिप मंटगे , दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुभद्राताई मुळे, कल्पना गायकवाड सोसायटीचे माजी अध्यक्ष शाहूराज पाटील, दत्तात्रय कोरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश पुदाले, नगरसेवक विनायक अहंकारी, बसवराज धरणे , रिपाई जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते संदिप गायकवाड , समीर सूरवसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड , डॉ विजय सावंत , डॉ. शिवाजी घोडके , प्रा मोतीराम पवार यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.