भारतीय संस्कृतीच्या विविधतेतील एकतेचा आदर बाळगा  -बसवराज डोनूर

अणदूर येथे एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

 अणदूर,दि.१० : चंद्रकांत हागलगुंडे 

 व्यक्तींपेक्षा राष्ट्र मोठे. राज्यांमधील भांडणे विसरून भारत माते विषयी जाज्वल्य भक्ती ठेवावी,आपल्या देशाच्या वैभवशाली संस्कृती व इतिहासाविषयी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवीन पिढीमध्ये जागरूकता आणावी,भारतीय ज्ञानपरंपरेच्या वैभवशाली इतिहासाचे पुनरुज्जीवन करून आजच्या काळाशी सुसंगत अभ्यासक्रम विकसित करून विद्यार्थ्यांना राष्ट्राविषयी अभिमान बाळगण्यास प्रेरित करावे,यासाठी भारतीय संस्कृतीच्या विविधतेतील एकतेचा आदर बाळगावा,असे मत कर्नाटक केंद्रीय विश्वविद्यालय कलबुर्गीचे शैक्षणिक कार्य संचालक  डॉ. बसवराज डोनूर यांनी व्यक्त केले. ते जवाहर महाविद्यालयामध्ये आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदे प्रसंगी बोलत होते .

 अणदूर (ता.तुळजापूर) येथील जवाहर महाविद्यालयामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून "भारतीय ज्ञान प्रणाली आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने आधुनिक भारतात सामाजिक परिवर्तन प्रक्रियेची पुनर्बांधणी" या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उदघाटन कर्नाटक केंद्रीय विश्वविद्यालय कलबुर्गी चे शैक्षणिक कार्य संचालक प्रो. डॉ. बसवराज डोनूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे सचिव रामचंद्र आलुरे हे होते. तर भारतीय ज्ञान प्रणाली लातूरचे तज्ञ प्रशिक्षक कविता बियाणी, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड,श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी चे प्राचार्य डॉ.गुलाब राठोड, ग्लोबल व्हिलेज चे प्राचार्य स्वामी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी,उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शिक्षणमहर्षी सि.ना आलूरे गुरुजी व स्व.शांताकाकी आलुरे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. वीरभद्र दंडे , जवाहर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अँड.लक्ष्मीकांत पाटील, उपप्राचार्य डॉ.मल्लिनाथ लंगडे उपस्थित होते. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. कविता बियाणी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत श्रेष्ठ आहे.आचार, विचार,आहार विहाराच्या सवयी आपण चांगल्या लावून घेतल्यास आपण आनंदी जीवन जगू शकतो.जीवनात आयुर्वेदाचे महत्त्वाचे स्थान आहे. हे फक्त भारतीयांना  ज्ञात आहे. 

आपले स्वयंपाक घर हे एक सुंदर औषधालय असून स्वयंपाक घरातील प्रत्येक स्त्री डॉक्टर आहे असे सांगितले. प्रास्ताविक व स्वागत पर विचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी व्यक्त केले.यावेळी, संशोधन पर पेपरचे वाचन करण्यात आले. बीएसएफ महाविद्यालय माकणी येथील अनिल गाडेकर व शंकरराव पाटील जावळे महाविद्यालयातील डॉ. सूर्यवंशी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात विचार व्यक्त केले. संशोधन पर ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या राष्ट्रीय परिषदेमध्ये जवळपास 75 संशोधनपेपर आले. पश्चिम बंगाल, दिल्ली, गुलबर्गा, महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून या परिषदेसाठी प्राध्यापक व संशोधनावरती विद्यार्थी उपस्थित होते.
        
परिषदेच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना दंडे म्हणाले की,स्किल समाजापर्यंत पोहोचवून आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जावे लागेल.नवीन तंत्रज्ञान संकल्पना स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही.भारतीय संस्कृती एकसंघ आहे .आजपर्यंत आपण जन्माने भारतीय, मानसिकतेने विदेशी होतो.आपली मूळ संस्कृती काय आहे,याबद्दल जाणून घेऊन भारतीय ज्ञान परंपरेची कास धरल्यास आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, असे अनमोल विचार व्यक्त केले. या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने प्रा.डाॅ. प्रसन्न कंदले यांनी रेखाटलेली रांगोळी,फलक लेखन व सजावट लक्षवेधी ठरले. यावेळी उपस्थित पाहुण्यांचा परिचय डॉ.अनिता मुदकण्णा व  डॉ. धनंजय गटलेवार यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी केले तर आभार प्रा. डॉ. वीरभद्रेश्वर स्वामी यांनी मानले. परिषदेचे अहवाल वाचन संयोजक डॉ. विवेकानंद वाहुळे यांनी केले. 

या चर्चासत्रासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषद यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांसह प्रा. शैलेश शाईवाले,संतोष चौधरी विजय बसवंत बागडे,दिलीप चव्हाण, अमित आलुरे,गणेश सर्जे, सुमित चौधरी,शुभांगी स्वामी,महादेव काकडे यांनी सहकार्य केले.
 
Top