नळदुर्ग महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थीनीची विद्यापीठाच्या सॉफ्टबॉल संघात निवड
नळदुर्ग ,दि.३०: डॉ. दिपक जगदाळे
येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कु.मानसी राजेंद्र राठोड, कु.सुप्रिया विनोद राठोड , कु.वैष्णवी मोतीराम राठोड या तीन मुलींची विक्रमा सिंहपुरी विद्यापीठ नेल्लोर, (आंध्रप्रदेश) येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हासदादा बोरगांवकर संस्थेचे सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष राठोड, नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके, वनस्पती विभाग प्रमुख डॉ.विजय सावंत,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.मोतीराम पवार कार्यालयीन अधीक्षक श्री.धनंजय पाटील,प्रा.डॉ. दिपक जगदाळे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डॉ.कपिल सोनटक्के, डॉ.अशोक कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.