महामंडळ स्थापन झाले हे समाजाचे श्रेय,समाजाच्या पाठिंब्यामुळेच संघर्ष करण्याची प्रेरणा- दिपक रणनवरे

नळदुर्ग,दि.२६

 भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाबाबत सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रम नळदुर्ग शहरातील मल्लिकार्जुन मंदिर येथे आयोजित केला होता, कार्यक्रमाच्या सुरुवातीस काश्मीर (पहलगाम) येथे झालेल्या दहशतवादी हल्यात मृत्नायुमुखी पडलेल्या 
 नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भगवान परशुराम,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात केली,या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून महामंडळ स्थापन होण्यासाठी अन्नत्याग करणारे उपोषणकर्ते व पेशवा युवा संघटनेचे संस्थापक दिपक भाऊ रणनवरे हे उपस्थित होते,या निमित्त त्यांचा ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमात समाज बांधवाना दिपक भाऊंनी महामंडळा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व याचा गरजुनी लाभ घ्यावा असे आवाहन केले,यावेळी पेशवा युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी,ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी,सचिव मुकुंद नाईक यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ रामदासी यांनी केले व आभार मनोज कुलकर्णी यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  अजय अणदूरकर,प्रदीप ग्रामोपाध्ये,उमेश नाईक,महेश अंबुलगे,अजय देशपांडे,सचिन भूमकर, संदीप वैद्य,प्रसन्न कुलकर्णी,सचिन होर्टीकर,नितीन कुलकर्णी,राजू वैद्य,सनी भूमकर,ज्ञानेश्वर केसकर,मयूर जोशी,सुदर्शन पुराणिक,आनंद कमठाणकर,संतोष नाईक यांच्यासह ब्राह्मण समाज संघटना,पेशवा युवा संघटना,परशुराम प्रतिष्ठान,मध्व मंडळ,उपाध्ये मंडळाचे सदस्य यांनी प्रयत्न केले,यावेळी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top