श्री हनुमंताची छबिना पालखी सोहळा,टाळ-मृदंग गजर, भक्तीत तल्लीन भक्त
कलाकारांनी सादर केला हनुमानांचा सजीव देखावा,सेल्फीसाठी गर्दी

मुरूम दि.१९ :

 दि.१२ रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला आणि दि.१६ रोजी म्हणजेच पाचव्या दिवशी मुरूम शहरातील श्री हनुमान मंदिरातील श्री हनुमंताची छबिना पालखी सोहळा असंख्य भक्तांच्या उपस्थितीत थाटात,भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 


शहरातील प्राचीन मंदिर आणि अनेक शतकापासूनची रूढी-परंपरा आजही मंदिर समितीच्या वतीने जोपासले जातात, मंदिर परिसर,गाभारा ते आजरोजी संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा ने श्री हनुमंताची यात्रा मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होत झाला. दि.१२ पासून सुरुवात झालेल्या उत्सवाची आजरोजी छबिना पालखीने भक्तिमय वातावरणात सांगता संपन्न झाले. प्रारंभी सकाळची आरती पिया उर्फ संतोष मूदकण्णा व त्यांच्या परिवाराच्या वतीने संपन्न झाला. सायंकाळी श्रीराम कुलकर्णी मित्र मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून पूजन संपन्न झाला. 

किसान चौकातील महादेवाच्या मानाची काट्याचे मंदिरात आगमन महाआरतीने छबिना आणि पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. विधुत रोषणाईने सजवलेल्या छत्र्या, बँड-बाजा आणि वानेवाडीच्या चिमुकल्याचा भजनी मंडळ, संगमनेर येथील श्री हनुमान,महाकाल यांच्या सजीव देखावाचे सादरीकरण करणारे कलाकार, अशा भरीव संस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण करत श्री हनुमान चौकापासून ते अशोक चौक,टिळक चौक,किसान चौक,सुभाष चौक,गांधी चौक मार्गे छबिना पालखी टाळ-मृदंगाचे गजरात,भक्तिगीते, भजन,अभंग, श्री हनुमानाचा सजीव देखावेचे सादरीकरण करत मंदिरात पालखी प्रवेश झाला. मिरवणूकी दरम्यान पालखीचे ठिकठिकाणी भक्तिमय वातारणात स्वागत करण्यात आले आले, सुभाष चौकातील टेकाळे,कलशेट्टी परिवाराच्या वतीने पूजन संपन्न झाला. संगमनेरहुन आलेल्या कलाकारांनी मुरूम शहरातील चिमुकल्या पासून ते वयोवृद्ध नागरिकांचे मने जिंकली, सेल्फीसाठी गर्दी लोटली. महिला भगिनींनी फुगडी खेळला. अशोक चौकात श्री रामाच्या भक्तित चिमुकल तल्लीन होऊन भजनी मंडळात सहभाग होऊन केलेला नृत्य म्हणजेच आजही घरोघरी धर्म-संस्कृती आणि परंपरा जोपासली जाते यापेक्षा मोठं उदाहरण होऊ शकत नाही. मिरवणुकी दरम्यान जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील,कन्या गीताताई पाटील यांनी दर्शन घेतला. यावेळी प्रशांत पाटील, हनुमान मंदिर विसवस्त मंडळ मुरूमचे अध्यक्ष- ऍड उदय वैध, उपाध्यक्ष जगदीश मीणियार, सदस्य व्यंकटराव जाधव,अशोक मीणियार,डॉ.नितीन डागा,मंदिर पुजारी राम पुजारी,बलभीम पुजारी सह हनुमान युवक मंडळाच्या वतीने छबिना आणि पालखी मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले तर मिरवणूक दरम्यान कसल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने सह्ययक पोलीस निरीक्षक संदिफ दहिफळे, सहायक पोलिस फौजदार नवनाथ गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते.

हनुमान जन्मोत्सवला सुरुवात झालेल्या सोहळ्याचे  छबिना आणि पालखी ग्रामप्रदक्षिणाने अगदी भक्तिमय आणि शांततेत समारोप संपन्न झाले, मिरवणूकीत असंख्य भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता, श्री कुलकर्णी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते असंख्य भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. थाटात आणि भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न झाला.
 
Top