नळदुर्ग  तहसील कार्यालयातुन  कामकाजास प्रारंभ ; आमदार राणाजगजितसिंह पाटील 

नळदुर्ग,दि.०६ : नवल नाईक 

नळदुर्ग व परीसरातील नागरिकांच्या सोयीकरिता नळदुर्गला अप्पर तहसील कार्यालय मंजुर करण्यात आले होते. या भागातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी महायुती सरकारने पुर्ण केली आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष अपेक्षित कामाला सुरवात झाली आहे. तालुका स्तरावरील दाखल्यांसाठी जळकोट व नळदुर्ग महसुल मंडळातील नागरिकांना आता तुळजापूरला जाण्याची गरज भासणार नाही.अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

अप्पर तहसीलदार  अभिजीत जगताप यांनी दि.०४ एप्रिल रोजी नळदुर्ग येथे तलाठी व कोतवाल यांची बैठक घेतली. सध्या या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. या कार्यालयासाठी दोन नियमीत पदांना मंजुरी असुन नियमीत वेतन श्रेणीवर वाढीव पदे मंजुर करण्याची मागणी महसुल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे. सध्या या कार्यालयात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरील कार्यालयात प्रत्यक्ष कामकाज सुरु झाल्याने या भागातील नागरिकांना नक्कीच मोठा फायदा होईल.असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

 
Top