तब्बल चव्वेच्याळीस वर्षांनी आले पहिली तील मित्र सपत्नीक एकत्र
धाराशिव,दि.२०: कल्याण करपे
धाराशिव तालुक्यातील चिखली येथे गांधी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्स्फूर्तपणे संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी हे दैवत असे मानणारे कालिदास गोविंदराव कुलकर्णी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत रामकृष्ण मते निवृत्त मुख्याध्यापक गांधी विद्याल्याचे अध्यक्ष जलराज शाहूराज चोबे, गिरी सर, सेवा निवृत्त केंद्रप्रमुख रामदास कदम वसंत यशवंत जाधव हे होते .
कार्यक्रमाचे मनोगतात कल्याण शिवशंकर करपे ,शिवाजी मुळे, शरद राऊत, एस टी कामगार राज्य पदाधिकारी महादेव आत्माराम गरड ,आशिव केंद्रिंय मुख्याध्यापक ता औसा यांनी आपल्या आठवणीस उजाळा देत आपल्या मित्राचे कौतुक करून भावी काळाच्या शुभेच्या दिल्या. कार्यक्रमासाठी कुलकर्णी सरांचे चिरंजिव महेश कुलकर्णी व त्यांची नात उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी राजाभाऊ आबाराव पोंदे, दिलीप जाधव, भागवत मते ,जलराज चोबे यांनी विषेश परीश्रम घेतले. सुत्र संचलन विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब वामणराव पाटील यांनी केले तर आभार राजाभाऊ पोंदे यांनी मानले .
मी तुमच्यासारखे गुणवंत विद्यार्थी घडवले आज याचा आनंद वाटतो असे प्रतीपादन कालिदास कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थी हे सपत्नीक हजर असल्यामुळे सर्वांना त्यांच्या मुलांना खुप आनंद झाला असे महीलातुन ऐकण्यास मिळाले. शेवटी सह भोजना होवुन कार्यक्रमाची सांगता झाली.