नळदुर्ग : स्नेह मेळावा प्रसंगी एकत्र जमलेले अंजनी प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी 

नळदुर्ग,दि.०३:

नळदुर्ग येथील अंजनी प्रशाला या शाळेतील 
माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवार (दि.३) रोजी अंबाबाई मंदिर सभागृह येथे संपन्न झाला.

सन २००३-०४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी तब्बल वीस वर्षांनी एकत्र जमले. यावेळी सर्वांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत सध्याची सुरू असलेली वाटचाल याबाबत सविस्तर चर्चा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षपदी संस्थाचालक  सुभद्राताई मुळे, प्रमुख पाहुणे निवृत्त मुख्याध्यापक प्रदीप  कदम, जितेंद्र मोरखंडीकर , राजा शिंदे, उषा आवटे , विद्या ठोकळ, दीपक मुलगे, दोलतराव खाटमोडे, श्री देवकते, बाळासाहेब रणशूर यांच्यासह विद्यार्थी संदीप सावंत, अशोक चव्हाण, शिवाजी सुरवसे, अमित सुरवसे, नागेश कुलकर्णी, मयूर जोशी, रविकांत महाबोले, सत्यजित कदम, शिवय्या स्वामी, तात्या जाधव, दयानंद सोलापूरे, महेश जाधव, शिवानंद राठोड, प्रदीप माने, वैभव चौधरी, मनोज पाटील, संजय फरताळे, शिल्पा येडगे, अंजली जाधव, ज्योती चव्हाण, अनिता भोसले, राधाबाई घुगे, सुनिता सावंत, पूजा हत्ते, संगीता शेंडगे, राहुल क्षिरसागर, रेखा दस, ज्योती कलशेट्टी, सुनिता दळवे, दत्तात्रय चौरे, विनायक धर्मशाले, अरुणा शिंदे, मनिषा खबुले, किरण वर्हाडे यांच्यासह
शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

प्रास्ताविक शिवानंद राठोड, सूत्रसंचालन संदीप सावंत तर आभार शिवाजी सुरवसे यांनी मानले.
 
Top