आमदार राणाजगजितसिंह पाटील उद्या घेणार "जनता दरबार"
नळदुर्ग नगरपरिषदेत होणार जनता दरबार

नळदुर्ग,दि.१५:

मित्र चे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील  हे शुक्रवार १६ मे रोजी जिल्ह्यातील नागरिकांसाठी नळदुर्ग नगरपरिषद येथे  जनता दरबार घेणार आहेत. 

सकाळी १०.०० ते १२.३० या वेळेत ते जनतेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहेत. प्रत्येकाला भेटणार आहेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार आहेत. तरी ज्यांच्या कांही अडचणी असतील त्या नागरिकांनी आपली समस्या लिखित स्वरूपात घेऊन आवश्यक कागदपत्रांसमवेत जनता दरबारात  उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top