शहापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी 

नळदुर्ग,दि.०१:

तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंतीचे औचित्य साधून  मौजे शहापूर येथे जन्मोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. गावातील सर्व ग्रामस्थ व अहिल्यादेवी जन्मोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करुन  भव्य मिरवणूक काढण्यात आली.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती
अध्यक्ष व ग्रामपंचायत कार्यालय शहापूर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व इतर गावातील विविध तरुण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सहकार्याने जयंती उत्सव पार पडले.
 
Top