नळदुर्ग : वसंतनगर प्रभागातील भाजपा आयोजित जनता दरबारास नागरिकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद
नळदुर्ग,दि.२९ :
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार नळदुर्ग शहरातील वसंतनगर प्रभागात शनिवार दि.२८ जुन रोजी आयोजित जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध समस्या मांडल्या.यावेळी भाजपच्या पदाधिका-यानी नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने संबंधिताना सुचना दिले आहे.
मोदी सरकारचे 11 वर्ष पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने आतापर्यंत भाजपच्या वतीने राबविलेल्या योजनेची माहिती नागरिकांना देण्यकरिता आणि नागरिकांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी "संकल्प ते सिद्धी" अभियानांतर्गत नळदुर्ग शहरातील वसंतनगर येथे शनिवार दि.२८ जुन रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आले होते.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश दंड नाईक, तुळजापूर तालुका माजी अध्यक्ष संतोष बोबडे , , सुशांत भुमकर , माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे , नळदुर्ग मंडळाध्यक्ष बसवराज धरणे , माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे ,श्रमिक पोतदार, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, माजी नगरसेवक निरंजन राठोड, माजी नगरसेविका छमाबाई राठोड , कैलास चव्हाण, माजी नगरसेवक दत्तात्रय कोरे ,पांडुरंग पुदाले ,माजी नगरसेवक किशोर बनसोडे ,संजय जाधव , रियाज शेख आदी उपस्थित होते.
याप्रसंगी वसंतनगर येथिल घर जागेची नोंद न.प.दप्तरी घेवुन कुटूंबाना ८ अ नक्कल देणेबाबत, नवीन रस्ता करणे, स्वच्छता, स्माशानभुमीची मागणी, महिलांकरिता स्वच्छतागृह, आरो प्लान्ट चालु करणे, अनेक महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे चालु करणे, तुंबलेल्या गटारी काढणे बाबत आदीसह इतर विषयी नागरिकांच्या तक्रारी आले.
याप्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश दंड नाईक यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी वसंतनगर येथील रवी महाराज राठोड, , सुरेश राठोड, दत्ता राठोड, सुरज वाघमोडे, शाम पवार, विराप्पा पवार ,भानुदास राठोड ,शिवाजी राठोड, संजय राठोड, शंकर दुर्लेकर, बाबु राठोड आदीसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी बाळू पवार, सतीश राठोड ,विनोद जाधव, मिथुन राठोड आदींनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक सुशांत भुमकर, आभार धिमाजी घुगे यांनी सर्वांचे आभार मानले.