नळदुर्ग,दि.२१ :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे , माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी आयोजित मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीरात ३१ जणांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उदघाटन मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे यांच्या हस्ते शहराध्यक्ष अलिम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली . या शिबिरात माजी नगरसेवक संजय बताले,माजी उपनगराध्यक्ष नय्यर जहागीरदार,माजी नगरसेवक विनायक अहंकारी,सुशांत भूमकर, माजी नगराध्यक्ष शाहबाज काझी, कमलाकर चव्हाण,नेताजी महाबोले, पत्रकार विलास येडगे यांनी भेट देऊन आपली तपासणी केली. या मान्यवरासह ३१ जणांनी आपली तपासणी करुन घेतली.
शिबीर यशस्वी करण्यासाठी मनसेचे दिलीप शंकरशेट्टी, गणेश बिराजदार,शिरीष डुकरे,सोमेश्वर आलूरे यांच्यासह पदाधिका-यांनी परिश्रम घेतले,शिबिरामध्ये ओम लॅबचे शशांक शंकरशेट्टी व श्रीमती शेरखाने त्यांच्या सहका-यांनी नागरिकांची तपासणी केली, यावेळी दशरथसिंग ठाकूर,अरुण जोशी,मानसिंग ठाकूर,विश्वनाथ हत्ते, आण्णा जाधव,तानाजी नागणे आदी नागरिक उपस्थित होते.