श्री श्री गुरुकुल येथे जागतिक योग दिवस साजरा ; सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
अणदूर, दि.२१ : चंद्रकांत हागलगुंडे
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व श्री श्री गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने योगासन,प्राणायाम व ध्यान घेऊन जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
योग दिनाची सुरुवात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते योग गुरु श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ योग प्रशिक्षक डॉ जितेंद्र कानडे यांच्या हस्ते करण्यात आले.मुखाध्यापक तथा योग प्रशिक्षक लक्ष्मण नरे यांनी योगासने, प्राणायाम ध्यान यांची माहिती देवून व ओमकार व प्रार्थना घेऊन प्रात्यक्षिके करून दाखवली.
यावेळी हळू हळू चालण्यापासून ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, पद्मासन,कटिचक्रासन, पर्वतासन,योगमुद्रा, अर्धमत्छेद्रासन, वज्रासन,शिशुआसन, शलभासन, भुजंगासन, धनुरासन, नौकासन, पवनमुक्तासन, सर्वांगासन, हलासन, मयुरासन, शीर्षासन, नाडीशोधन प्राणायाम, भ्रामरी, भस्रिका, प्राणायाम आदीचे मार्गदर्शन योग प्रशिक्षक लक्ष्मण नरे यांनी केले व शेवटी प्रार्थनेने करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक शिवराज भुजबळ, रामेश्वर सावंत,ज्ञानेश्वर बंडगर, विशाल महाबुले,अर्जुन माशाळकर यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
शारीरिक, भावनिक व मानसिक संतुलन ठेवण्यासाठी योग अत्यंत गरजेचे आहे.नियमित योगसाधनेने शरीर निरोगी राहते. मनाची एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांनी नियमित व्यवसायांना करावी. ती सर्वांसाठी लाभदायक आहे.
डॉ जितेंद्र कानडे
(जेष्ठ योग प्रशिक्षक,आर्ट ऑफ लिव्हिंग)