माधवराव पाटील महाविद्यालयात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची शपथ                                    

मुरूम, ता. उमरगा, दि. १९  : 

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत हरित धाराशिव अभियानांतर्गत एक पेड मा के नाम वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची कार्यक्रम शनिवारी  रोजी घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिला स्वामी आदींच्या प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. 


प्रा. डॉ. विलास खडके, डॉ. नरसिंग कदम, डॉ. विनायक रासुरे, डॉ. मुकुंद धुळेकर, डॉ. किरणसिंग राजपूत, डॉ. महेश मोटे, डॉ. राम बजगिरे, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. संध्या डांगे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ.अरुण बाबा, डॉ. दिनकर बिराजदार आदींनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण केले. नगर परिषदेच्या वृक्षारोपणात स्वयंसेवक आशिष राठोड, सुरेश माने, वर्षा राठोड, अंकिता राठोड, मेघा पवार, बबलू पवार, महेश राठोड आदींनी पुढाकार नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिला स्वामी तर आभार प्रा. अशोक बावगे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.         

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात वृक्षारोपण करताना अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, शिला स्वामी, प्रतापसिंग राजपूत, अशोक बावगे व अन्य.
 
Top