जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांची  लोहगाव गावास भेट देवुन ग्रामस्थांशी चर्चा 

नळदुर्ग,दि.०४ :

लोहगाव ता.तुळजापूर या गावास शुक्रवार दि.४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी भेट देवुन 
खासगी जागेतील भोगवटदार घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याविषयी ग्रामस्थांशी चर्चा केली.
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथिल अहिल्यावती नगर येथील   जागेवर घरकुल प्रकरणी संरपच प्रवीण  पाटील, उपसरपंच प्रशांत  देशमुख आदीसह लाभार्थ्यांनी धाराशिव येथे गुरुवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन चर्चा केली होती. जिल्हाधिकारी यांनी शुक्रवार रोजी
लोहगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन  जागेची  पाहणी केली.

  खासगी जागेतील शेतकरी व गावकऱ्यांच्या  समवेत चर्चा करत घरकुल बांधकामप्रकरणी अडचणी जाणुन घेतली.  ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव देण्याबाबत संबंधिताना सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी ग्रामपंचायत कार्यालयास  भेट दिली. त्यांचा व उपस्थित आधिका-याचा  सरपंच प्रवीण पाटील यांच्या हास्ते सत्कार करण्यात आले.
 यावेळी  जिल्हाधिकारी  यांच्यासमवेत जि.प. चे  मुख्य कार्यकारी अधिकारी  मैनांक घोष,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व तसेच घरकुल प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा  विलास जाधव, तुळजापूर तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी  हेमंत भिंगारदिवे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रोग्रामर  मेघराज पवार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी ग्रामसेवक जी.आर. जमादार,  जळकोट मंडळाचे मंडळ अधिकारी  भोकरे, तलाठी गायकवाड ,
उपसरपंच प्रशांत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विनायक काटकर, युवक कार्यकर्ते अतुल पाटील, विरु मेंढके ,प्रेमनाथ मारेकर, अनिल लांडगे, अमोल कुंभार , दत्तात्रय सोमवंशी आदीसह ग्रामपंचायत सदस्य, युवकासह ग्रामस्थ  उपस्थित होते.

  प्रवीण  पाटील, सरपंच 
तुळजापूर तालुक्यातील लोहगावाच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हाधिकारी हे ग्रामीण भागातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आमच्या विनंतीस मान देवुन गावास  आले. 

 
Top