अल्पावधितच वागदरी पाटी ते नळदुर्ग रस्त्याचे डांबरीकरण उखडले: गुत्तेदाराचा खिसा भरला, शासनाचा कोट्यावधीचा निधी मातीत 

वागदरी,दि.२३: एस.के. गायकवाड 

 नळदुर्ग ते अक्कलकोट जाणाऱ्या रोडवरील वागदरी पाटी ते नळदुर्ग रोडचे नव्याने केलेले डांबरीकरण अल्पावधीतच जागो जगी उखडले असून लवकरचं येरे माझ्या मागल्या म्हणण्याची वेळ येते की काय असे चित्र निर्माण झाले आहे . त्यामुळे शासनाचा कोट्यावधी निधी मातीत गेला असे म्हणटले तर वावगे ठरणार नाही.
  
याबाबत माहिती अशी की, दहा वर्षापूर्वी  नळदुर्ग ते अक्कलकोट या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २६५ मध्ये रूपांतर होऊन दोन पदरी मोठा सिमेंट रोड बनविण्याचे काम जलद गतीने सुरू करण्यात आले होते. त्यात काही शेतकऱ्यांनी "शेतकरी संघर्ष" समितीच्या माध्यतून जमीनीचा मावेजा मिळवा म्हणून जागो जागी या सिमेंट रस्त्याचे काम आडविले व न्याय प्रविष्ठ केल्याने ज्या ठिकाणी रस्ता आडविला होता. त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून या रस्त्यावरील वहातूक व्यवस्था संपूर्ण खोळंबली होती.तब्बल  सात ते आठ वर्षे हा त्रास जनतेनी सोसला होता.शेवटी शेतकरी आणि शासन यांच्यात समन्वयाने जिथे काम रखडले तिथे पूर्वीच्या राज्य मार्गाप्रमाणे डांबरीकरण करून वहातूक व्यवस्था सुरळीत करण्याचा तोडगा निघाला. 

त्याकरिता शासनाने  निधी मंजूर केला. त्यानुसार वागदरी पाटी ते नळदुर्ग रखडलेल्या आणि उखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून फक्त तिन चार महिने ही झाले  नाहीत. तरी नव्याने केलेले डांबरीकरण वागदरी पाटी ते नळदुर्गकडे जाणारा रस्ता पाटी पासून हाकेच्या अंतरावर नव्याने किलेले डांबरीकरण पूर्णतः उखडले आहे. पुढे गणेश खिळा  नळदुर्ग पर्यंत जागो जागी नव्याने केलेले डांबरीकरण उखडून खड्डे पडत आहेत. पावसाळ्यात हे डांबरीकरण पूर्ण पणे उखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढे या रोडवरून ऊस वहातुक सुरु झाली की रोडची अत्यंत दुरावस्था होऊन परत येरे माझ्या मागल्या म्हणण्याची वेळ आल्यावाचून राहन नाही.

  तेंव्हा शासनाने' वेळीच याकडे लक्ष देवून संबधित गुत्तेदार व कार्यकारी अभियंता यांच्यावर योग्य ती कारवाई करून नव्याने पुन्हा एकदा या रोडचे डांबरीकरण करून या रोडवरील वहातूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top