वृक्षारोपणाकडे नळदुर्गच्या नागरिकांची पाठ, जनजागृती करण्यात पालिका प्रशासन अपयशी?
नळदुर्ग,दि.१९ :
नळदुर्ग नगरपालिका प्रशासनाने मागील महिनाभरापासून मोठा गाजावाजा करत वृक्षारोपणाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम घेतला. मात्र मागील महिनाभरात पालिका प्रशासनाने सामान्य नागरिक, शहरातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांना विश्वासात न घेतल्यामुळेच या वृक्षारोपण कार्यक्रमाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. पालिका प्रशासनाला अक्षरशा महिला बचत गटाच्या महिला व पालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने वृक्षारोपण कार्यक्रम अक्षरशा ओळखण्याची नामुष्की ओढवल्याचे दिसून आले.