रोटरी क्लबच्या वतीने पालीवरील महिलांसाठी साडीचोळीचे वाटप

मुरूम,दि.१२ :

 रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने आणि रोटरी क्लब मुरूम सिटीचे सदस्य शिवशरण वरनाळे   यांच्या वाढदिसानिमित्त गणेश नगर मुरूम येथील पालीमध्ये राहणाऱ्या महिलांना टॉवेलटोपी साडीचोळी भेट म्हणून देण्यात आले.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि गोरगरिबांना मदत करणे हेच रोटरीचे मोलाचे कार्य आहे त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्ताने आपण महिलांसाठी टॉवेलटोपी साडीचोळीचे वाटप करत आहात   हे मोठे अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन शिवशरण वरणाळे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष अप्पासाहेब सूर्यवंशी ,सचिव कल्लप्पा पाटील हे उपस्थित होते.शिवशरणमामा वरनाळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा सत्कार शरणप्पा धुम्मा यांनी केला. रोटरी क्लबच्या माध्यमातून शिवशरण वरनाळे यांनी अनेक समाज उपयोगी काम केलेले आहेत असे प्रकाश रोडगे म्हणाले.

कार्यक्रमाची सुरेख असे संचलन संतोष कांबळे यांनी केले आणि आभार सचिव कलप्पा पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी सुनील राठोड,भूषण पाताळे, प्रा. राजेंद्र वाकडे, प्रा. कलय्या स्वामी, बाबासाहेब पाटील, अमृत वरनाळे, बसवेश्वर नागरी पतसंस्थेचे कर्मचारी , पालीवरील अनेक महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.
 
Top