शिवचरित्रचा विचार अंगीकारण्यासाठीच रायगडावर जावं - प्रशांत देशमुख
आरळी बुद्रुक येथे ग्रामकन्यांना कृतज्ञता पुरस्काराचे वितरण
तुळजापूर,दि.११: अनिल आगलावे
राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी एकत्रित जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले जीवन खर्ची घातले, शिवचरित्रचा विचार अंगीकारण्यासाठी रायगडावर जायचं आणि जगण्याची ऊर्जा घेऊन यायचं तिथे जी अनुभूती मिळते यातून नक्कीच तुमचं जगणं सुंदर करा असा विचार यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी दिला.
तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे कै. इंदुमती अशोकराव उकरंडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या ग्रामकन्यांचा रायगड येथील प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि जय शिवराय पुस्तकाचे लेखक प्रशांत देशमुख यांच्याहस्ते कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आरळीच्या माहेरवाशीन ग्रामकन्या सीमा अरुण जोत - गिरी, रिझवाना मिरासाहेब शेख - मुजावर, शुभांगी भीमराव सोनवणे - राऊत,सीमा मल्लिनाथ वैद्य, आदर्श माता पुरस्कार भिवराबाई वडवे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमांसह सन्मानपत्र, माहेरची साडी देऊन ग्रामकन्या कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी सरपंच किरण व्हरकट, मन्मथ उकरंडे,अब्दुल सय्यद,मधुमालती पारवे आदी उपस्थित होते.
बोलताना प्रशांत देशमुख म्हणाले की,राजामाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांनी केलेलं कार्य अलौकिक होते,अशा महान व्यक्तींचा जिवनप्रवास असण्याइतकाच नसल्यावर ही जगणं सुंदर असल्याची भावना शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केली.
समाजाचं जगणं सुंदर व्हायला ज्यांची उंची आभाळा ऐवढी असेल त्यांनी उंची त्यांनी खालती असणाऱ्या व्यक्तीला हात द्यावा, पण आजचा समाज हात देण्याऐवजी एकमेकांची पाय खेचतात हि खेदाची बाब आहे.
स्मृतिदिनानिमित्त रायगड येथील प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि जय शिवराय पुस्तकाचे लेखक प्रशांत देशमुख यांचे जगणं सुंदर आहे याविषयावर व्याख्यान सादर केले.प्रशांत देशमुख लिखित जय शिवराय या पुस्तकाचे प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि विठोबा पारवे वाचनालय यांना वितरण करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले, प्रस्तावना डॉ. शिवाजी उकरंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विकास जोत, धैर्यशील नारायणकर, शिवानंद गवळी, चंद्रकांत उळेकर,ज्ञानेश्वर उकरंडे,विलास उकरंडे,शेखर उकरंडे, प्रशांत उकरंडे आदींनी परिश्रम घेतले, याप्रसंगी उकरंडे परिवारातील सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.