श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ह भ प कु.तेजश्रीताई खटके महाराज यांचे कीर्तन 

नळदुर्ग,दि.१९: 

प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत सेना महाराज नाभिक समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दि 20 ऑगस्ट रोजी सकाळी  10 वाजता नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  सचिन यादव  यांच्या  हस्ते व शहरातील सर्व  प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे  पूजन करून  प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.  त्यानंतर ह भ प कु. तेजश्रीताई खटके महाराज (आळंदीकर )यांचे काल्याचे कीर्तन होवुन  महाप्रसादाचे  वाटप होणार आहे.

नळदुर्ग व परिसरातील सर्व वारकरी संप्रदायातील भाविक भक्त , नागरिकांनी व समाज बांधवानी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष संदीप सुरवसे, उपाध्यक्ष नेताजी महाबोले, सचिव महादेव माने, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नागनाथ वाळके, उपाध्यक्ष गोवर्धन आतकरे व उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल सुरवसे ,उपाध्यक्ष श्रीकांत आतकरे व मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.
 
Top