नळदुर्ग, दि.१० : नवल नाईक 

नळदुर्ग शहरातील लोकमान्य गणपतीच्या कट्ट्यावर स्टीलचे बॅरिकेट करण्याचे काम हाती घेतले असून त्या कामासाठी निधीची आवश्यकता आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या कामासाठी देणगी देऊन सहकार्य करण्याचे  आवाहन करण्यात आले आहे 

नळदुर्ग शहरातील हे एकमेव  गणपती मंदिर आहे.लोकमान्य संस्कृतिक मंडळाची स्थापना १९८८ साली करण्यात आली असुन हे मंडळ नोंदणीकृत आहे. दररोज "श्री" ची पुजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर गणेश जयंती साजरी केली जाते. यादिवशी अन्नदानही करण्यात येते, दहा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यापुर्वी मंडळांच्या उपक्रमाची दखल घेवुन जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पोलिस खात्याच्या वतीने देण्यात आले आहे.

लोकमान्य सांस्कृतिक मंडळ सर्व सदस्य गणेश मंडळ, गणेश भक्त यांना आवाहन करण्यात येते की, लोकमान्य गणपतीच्या कट्ट्यावर स्टीलचे बॅरिकेट करण्याचे काम हाती घेतले असून त्या कामासाठी निधीची आवश्यकता आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या कामासाठी देणगी देऊन सहकार्य करावे
तरी इच्छुकांनी या कामासाठी  सढळ हाताने मदत करावे. कामासाठी सहकार्य करावयाचे असल्यास त्यांनी श्री  वसंत रामदासी  ( मो. 9730480611),    विश्व मेडिकल येथे संपर्क साधण्याचे आवाहन  लोकमान्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ माळगे, उपाध्यक्ष भीमराव मोरे, सचिव किरण पाटील, कोषाध्यक्ष वसंत रामदासी आदीनी केले आहे.

   लोकमान्य गणपती मंदिरात मंगळवार दि.१२ ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त  सकाळी ७ वाजता महाभिषेक, सायंकाळी महाआरती  होवुन प्रसादाचे वाटप होणार आहे. तरी गणेश भक्तांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
Top