उमरगा तालुक्यातील दाळिंब तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी धिरज इंगळे तर उपाध्यक्षपदी सुनील पवार यांची ग्रामसभेत निवड करण्यात आली. त्यांचा ग्रामपंचायतीच्य वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी निवड झालेल्या नुतन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धिरज इंगळे , उपाध्यक्ष सुनील पवार यांचे सरपंच परशुराम देवकते, ग्रामपंचायत अधिकारी सुधीर कदम , ग्रामपंचायत सदस्य रवि राठोड , मोहन राठोड ,शिवसेना गटप्रमुख खयूम चाकूरे, राष्ट्रवादीचे बाबा जाफरी, असलम शेख, बालाजी सातपुते, दयानंद माळगे आदीसह ग्रामस्थांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.