भारतीय जनता पक्ष  जिल्हा सरचिटणीसपदी  सार्थ निवड झाल्याबद्दल साहेबराव घुगे यांचा सत्कार 

नळदुर्ग,दि.१३ : 

भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हा सरचिटणीसपदी  सार्थ निवड झाल्याबद्दल साहेबराव घुगे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने नळदुर्ग शहर भाजप कार्यालयात बुधवारी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थी दशेपासुन अहोरात्र परिश्रम घेवुन पक्षांशी एकनिष्ठ राहणा-या, 
निष्ठावान  कार्यकर्ते  माजी  पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांची भाजपच्या धाराशिव जिल्हा सरचिटणीसपदी झालेली निवड योग्य असल्याचे कौतुक करत भाजपाचे नेते सुशांत भुमकर यांनी अभिनंदन केले.
सत्काराला उत्तर देताना साहेबराव घुगे म्हणाले की,  
जिल्ह्यातील नेतेमंडळींनी माझ्यावर विश्वास ठेवून सरचिटणीस पदाची जबाबदारी देऊन एक संधी दिली आहे. या संधीचे रूपांतर मी पक्षाची विचारधारा आणि जनतेच्या कामासाठी वापरणार आहे. पक्षकार्यासाठी  सातत्य ठेवून काम केले की, त्याची दखल घेण्यात येते.असेही त्यांनी सांगितले.

 आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तर  जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हा भाजपाची  कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 

 नव्या कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशा विविध पदांवर एकूण 70 पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील 17 मंडळांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. त्या प्रक्रियेत तब्बल 1,020 पदाधिकाऱ्यांची निवड होऊन पक्ष संघटना गावागावात अधिक मजबूत झाली होती. आता या जिल्हास्तरीय कार्यकारिणीमुळे पक्षाचे काम तालुक्यापासून जिल्हास्तरापर्यंत आले असून भाजपचे काम आणखी गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

या कार्यक्रमास नळदुर्ग शहर तालुका अध्यक्ष बसवराज धरणे, उपाध्यक्ष किशोर नळदुर्गकर, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे,  पद्माकर घोडके, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार,  सिकंदर काझी,  अजय देशपांडे,  गणेश मोरडे ,अक्षय भोई, पप्पु पाटील, सागर हजारे,  विशाल डुकरे, सचिन घोडके, संजय जाधव, उमेश नाईक, प्रमोद जाधव, प्रदिप ग्रामोपध्ये,पत्रकार सुहास येडगे, विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक आदी उपस्थित होते.

 
Top