गणेशोत्सवाच्या माध्यमातून साकारला धार्मिक आणि ऐतिहासिक देखावा.

नळदुर्ग,दि.०५:

गेल्या अनेक वर्षांपासून माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करताना भव्य स्वरूपात साजरा करतात.. अनेक वेगवेगळे विषय देखाव्याच्या माध्यमातून मांडत असतात.
यावर्षी हिमालयातील कैलास पर्वत बनवले आहे. यामध्ये महादेवाच्या पिंडीवर अभिषेक पडताना दाखवले आहे. त्याचबरोबर ऑपरेशन सिंधुरची माहिती देणारे फलक आणि भारतीय जवानांचा आजपर्यंतचा इतिहास फलक रूपाने मांडला आहे. तसेच शक्ती आणि भक्ती मध्ये शिवरायांचे मावळे आणि शेतकरी यांनाही दाखवले आहे..आजपर्यंत अनेक मान्यवर, नागरिक व माता भगिनीनी विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतलेले आहे.
 
Top