नळदुर्ग: पैगंबर जयंती मिरवणुकीत वादग्रस्त घोषणा ; हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध , कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा 

नळदुर्ग,दि.१०:

नळदुर्ग येथे पैगंबर जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) आयोजित मिरवणुकीत 'आलमगीर औरंगजेबच्या' नावाने व 'सर तनसे जुदा' या वादग्रस्त घोषणा दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ नळदुर्ग शहरातील हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात मंगळवार  दि.९ सप्टेंबर रोजी निवेदन दिले आहे. घोषणा देणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ गुन्हा दाखल करावे, अन्यथा नळदुर्ग शहर बंद करण्याबरोबरच रास्तारोको आंदोलन करण्याचा इशाराही  निवेदनाद्वारे  देण्यात आला आहे. 

रविवारी नळदुर्ग शहरात ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही तरुणांनी औरंगजेबच्या समर्थनार्थ  वादग्रस्त घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक सलोखा आणि शांतता धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराचा सर्वच स्तरातून टीका होत आहे. 

 हिंदू नागरिक आणि विविध संघटनाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नळदुर्ग पोलीस ठाण्यात जावुन  पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कुरुक्रर्मा औरंगजेबचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. याप्रकरणी जबाबदार असलेल्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा गाव बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आल आहे. तसेच नळदुर्ग अपर तहसीलदार यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर बहुतांश हिंदु बांधवांच्या सह्या आहेत.


 
Top