जिल्हास्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेत नळदुर्ग
जिल्हा परिषद प्रशालेचे यश
नळदुर्ग,दि.०४:
धाराशिव येथे दि. ४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय झालेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या हॉकी स्पर्धेत जि.प.प्रशालेने तृतीय क्रमांक पटकावले . या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.
नळदुर्ग शहरातील जिल्हा परिषद (मुलांची) प्रशालेतील इयत्ता ९ वी, १० वी घ्या १४ विद्यार्थ्यांनी हॉकी स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात तृतीय क्रमांक मिळविल्याने
शालेय व्यवस्थापन समितीतर्फे व मुख्याध्यापक निजामोद्दीन मैनोद्दीन इनामदार , क्रीडा शिक्षक विभाग प्रमुख , संजय सखाराम जाधव, श्रीमती तसनीम सुलताना मैनोद्दीन, श्रीमती शमशाद बेगम दखनी, श्रीमती दुगम अरुणा रवींद्र, श्रीमती निलोफर मैंदर्गी, श्रीमती जिनत सिकंदर हन्नुरे, श्रीमती कविता पुदाले, विक्रम नानासाहेब कदम, शेख युसुफ आदींनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.