ब्रिगेडियर ए जी बरबरे यांच्या हस्ते वैभवी शेंडगे व सुशांत जाधव यांचा गौरव

मुरुम,दि.०२: डॉ सुधीर पंचगल्ले 

 
छत्रपती संभाजी नगरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर ए जी बरबरे यांनी भारत शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसीचे कॅडेंटस वैभवी शेंडगे आणि सुशांत जाधव यांचा सत्कार करुन अभिनंदन केले . 

53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . ज्या कॅडेटसनी राष्ट्रीय , राज्यस्तरीय  योगदान दिल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र व किट देऊन  सत्कार  करण्यात आला . वैभवी शेंडगे हिने 26 जानेवारी 2025 रोजी राजपथ दिल्ली येथे पार पडलेल्या प्रजासताक दिनी महाराष्ट्राच्या संघातून ड्रिल परेड मध्ये तिने नेतृत्व केले होते. तसेच सुशांत जाधव याने ऑल इंडिया फायरिंग, थल सैनिक कँप फायरिंग स्पर्धेत इंटर ग्रुप काँपिटिशन पर्यंत तो मराठवाडा विभागात  प्रथम आला होता . या सत्कार प्रसंगी 53 महा बटालियन एनसीसी लातूरचे कमान अधिकारी कर्नल संतोष नवगन , सुभेदार मेजर शंभुसिंग व सर्व आर्मी स्टाफ कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते .
          
  याबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल  मोरे उपाध्यक्ष अश्लेष  मोरे तसेच  संचालक मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले , कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
 
Top