राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केली अतिवृष्टीची पाहणी

धाराशिव,दि.२३:

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन हे धाराशिव जिल्हा अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर आले असून त्यांनी पारगाव, ता.वाशी येथील मांजरा नदी पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुर परिस्थितीची माहिती दिली.

गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पारगाव जवळून वाहणाऱ्या मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याने पात्र सोडून परिसर कवेत घेतला आहे. मांजरा नदी पात्र सोडून तब्बल १ किमी अंतराने विस्तीर्ण होत वाहू लागल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील लहान मोठे नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत असल्याने नुकसानीची सर्वत्र अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मंत्री गिरिश महाजन यांच्या  निदर्शनास आणून दिले. 
यावेळी जिल्हाध्यक्ष  दत्ताभाऊ कुलकर्णी,  नितीन काळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.


 
Top