भवानी नगर भागातील रस्त्यांची दुर्दशा, नाली नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न गंभीर, नगरपालिके समोर नागरिकांचा उपोषण करण्याचा इशारा

नळदुर्ग ,दि.०९: नेताजी महाबोले

नळदुर्ग शहरातील भवानीनगर येथिल राजकुमार डुकरे चौक ते डी. एड. कॉलेज गेट पर्यंतचा रस्ता पावसाने जागोजागी उखडले आहे.सर्वत्र मोठ -मोठे खड्डे पडून पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली नाहीत. या भागातील समस्या सोडवुन नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा  नळदुर्ग नगरपरिषद कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी गुरुवार दि.०९ ऑक्टोंबर रोजी न.प. मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे  दिला आहे.

 सोमु खद्दे यांच्या घरापासून ते चिमणे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली नाही.  या रस्त्याच्या उजव्या बाजूस घंटे यांचे घर ते महाबोले यांचे घर रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाली नाहीत. श्रीनिवास कणकधर यांचे घर ते महेबूब शेख यांच्या घरापर्यंतचा सिमेंट रस्ता पूर्णपणे खचला असून हा रस्ता उतारीला आहे. याच्या खालचा पूर्ण भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला असून या रस्त्याने एखादे वाहन गेले तर हा रस्ता ढासळून कौरव यांच्या घरावर पडून मोठा अपघात घडू शकतो, या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्यांची आवश्यकता आहे व तसेच न्यू भोई गल्ली चौक ते अमृत पुदाले यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाली करणे, बाळकृष्ण मंदिर ते प्रकाश दासकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली नाहीत व महेबूब शेख यांच्या घरासमोर असणाऱ्या ओपन स्पेस मध्ये पिवळ्या रंगाच्या अज्ञात झूडपामुळे येथे खूप  मोठी अडचण झाली असून त्यामुळे मोठं -मोठे साप, इंचु अशा प्रकारचे विषारी प्राणी निघत आहेत. 

यामुळे येथे असणाऱ्या लहान मुलांना व नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. हे झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढावे  तसेच अंगुले  यांच्या घरापासून ते सुनील उकंडे  यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली करण्यात यावी, आदी नागरी समस्यांचे निवारण  करण्यात यावे याबाबत निवेदन भवानी नगर येथील नागरिकांनी दिले आहे. 

या निवेदनावर शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडी शहरप्रमुख मंजुश्री महाबोले, काँग्रेस उपतालुका अध्यक्ष संदीप सुरवसे, नेताजी महाबोले, दिपक सुरवसे, बलभीम कौरव, सुभाष स्वामी, अक्षय भोई, सोमनाथ खद्दे, अमोल दासकर, संदीप गायकवाड, योगेश महाबोले, संभाजी महाबोले, गणेश हिल्लाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top