संगणक अभियंता धर्मवीर लोंढे यांची निवड झाल्याबद्दल येडोळा ग्रामस्थांच्या वतीने गौरव

नळदुर्ग,दि.२५:

तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा (भिमनगर) येथील  धर्मवीर रागिणी देवानंद लोंढे सोलापूर येथील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये  संगणक अभियंता म्हणून शिक्षण घेणा-या धर्मवीर  यांची congnizent कंपनीत निवड  झाल्याबद्दल गावकऱ्यां वतीने सत्कार करण्यात आला.

 धर्मवीर हा इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात असताना त्यांच्या कॉलेज congnizent च्या campus Recruitment process साठी निवड झाली आहे.  त्यास  आई वडिलांचे सहकार्य लाभले आहे , त्याच्या  यशाबद्दल प्रगतिशील शेतकरी श्री खंडेराव पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका सरचिटणीस श्री रवी पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका उपाध्यक्ष  गोवर्धन लोंढे , माजी  ग्रामपंचायत सदस्य अमर जेठीथोर , रणवीर लोंढे आदींनी धर्मवीरचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
 
Top