भव्य लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शस्त्रपूजेनं संपन्न
मुरुम,दि.२७:
पी.एम.श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, केसरजवळगा आणि लाठी असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज शस्त्रपूजा करून मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्यस्तरीय हॉलीबॉलपटू मुनीर शेख सर उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष अजिज शेख, माजी सरपंच अमोल पटवारी, उपसरपंच जयपालसिंग राजपूत, सहशिक्षक सुनिल राठोड, बोडरे सहदेव, युसूफ गवंडी , श्रीशैल भुरे, कणमुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शस्त्रांची व साहित्याची पूजा करून पारंपरिक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यानंतर मुनीर शेख सर यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे व आत्मसंरक्षणाचे महत्त्व पटवून देत पारंपरिक भारतीय कलेचा गौरव सांगितला.दरम्यान उपसरपंच जयंपालसिंग राजपूत यांनी शाळेतील हुशार, गरजवंत वहोतकरू असलेल्या आशा 10 विद्यार्थ्यांची फिस देऊन सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार व कौतुक होत आहे.
या शिबिरात लाठी-काठी, भाला, दांडपट्टा, कराटे, सेल्फ डिफेन्स, लाल तलवार यांचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षक मोहमद रफी शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे. शिबिराचा कालावधी २६ ते ३१ ऑक्टोबर २०२५ असा असून दररोज सकाळी ८.०० ते ११.३० या वेळेत प्रशिक्षण होणार आहे.
या उपक्रमासाठी प्र मु अ बालाजी भोसले, सहशिक्षक सुनिल राठोड,संजीव भोसले, यु का प्र वैभव पाटील व सर्व शिक्षकवर्ग यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.