राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांच्या प्रवेशाने काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी ; नागरिकात चर्चेला उधाण 

नळदुर्ग,दि.११ : 

नगरपालिका निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शहरात अनपेक्षित राजकीय नाटयमय  घडामोडी घडण्यास  सुरुवात झाली आहे.त्याचा एक भाग राष्ट्रवादीचे (शरद पवार गटाचे) प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ऐन नगरपालिका निवडणुकीत राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.तर जगदाळे यांच्या प्रवेशाने काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याची नागरिकात चर्चा होत आहे.


नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांच्या  शोधात असतानाच माजी नगरसेवक तथा भाजपचे संजय बताले हे कमळला बाय बाय करत राष्ट्रवादी अजित पवार गटात नुकतेच मुंबईत जाहिर प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवार दि.११ नोव्हेंबर रोजी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय क्षेत्रातील समीकरण बदलणार की काय ? याबाबत चर्चेला नागरिकात उधाण आले आहे

 काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ,माजी मंत्री  अमित  देशमुख यांच्या  प्रमुख उपस्थितीत अशोक  जगदाळे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.

यावेळी  माजी नगराध्यक्ष नितीन कासार,माजी उपनगराध्यक्ष शरीफमुन्ना  शेख, माजी नगरसेवक अमृत  पुदाले,माजी नगरसेविका सौ.सुमन  जाधव, विकास सोसायटी चेअरमन संजय बेडगे,व्हाइस चेअरमन ताजोद्दीन सय्यद , रुकनोद्दीन शेख ,अलीम शेख,अमोल सुरवसे, दत्ता राठोड, नवलकुमार जाधव आदींनी पक्ष प्रवेश केला आहे.

🔶अशोक जगदाळे 🔶 
ऑक्टोबर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुक अक्षप म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या निवडणुकीत माघार घेतली होती.

नोव्हेंबर २०१६ मध्ये नळदुर्ग नगरपालिका निवडणुक लढवली. त्यामध्ये नळदुर्ग नगरपलिकेवर पहिल्यांदाच एक हाती सत्ता आणली. २५ वर्ष विरोधकांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपलिकेच्या निवडणुकीत वर्चस्व प्राप्त केले. १२ नगरसेवक व जनतेतून नगराध्यक्ष निवडुन आणला.

मार्च २०१७ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक लढवली होती. जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील ९ गटापैकी चार गटात विजय मिळवला होता. त्यामध्ये मंगरुळ, काटी, काटगाव व तामलवाडी गटाचा समावेश होता, तर आठ पंचायत समित्या निवडून आणल्या. कालांतराने येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांनी पक्षांतर करीत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

तुळजापूर तालुका कृषी उत्पन बाजार समितीची निवडणुक लढवत चार संचालक निवडुन आणले.

जुन 2018 साली बीड-धाराशिव (उस्मानाबाद)-लातुर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढवली. ही निवडणुक राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठिंब्यावर म्हणून लढवली होती. त्यामध्ये थोडक्या मताने निसटता पराभव स्विकरला.

ऑक्टोबर २०१९ मध्ये तुळजापूर विधानसभा मतदासंघात निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत ३८ हजार मते मिळवत तालुक्यात तिसऱ्या क्रमाकांवर राहिले होते
 
Top