भूलथापाला बळी न पडता राष्ट्रवादीच्या उमेदवाराना निवडून देण्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांचे आवाहन

नळदुर्ग,दि.०१ डिसेंबर 

कुरेशी समाजासह अल्पसंख्याक समाजावर अन्याय झाला. त्यावेळी काँग्रेस पक्षाने आवाज उठविला नाही.मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आवर्जुन दखल घेत अन्याविरुध्द  उभे राहिले. राष्ट्रवादी पक्ष सर्वाना सोबत घेऊन विकास करणारा असुन कुणाच्याही भूलथापाला बळी न पडता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराना निवडून देण्याचे आवाहन माजी मंत्री नवाब मलिक यांनी नळदुकराना केले.

नळदुर्ग नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले व नगरसेवक  उमेदवारांच्या प्रचार सभेचे ऐतिहासिक किल्ला गेट येथे  सोमवार दि.०१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी माजी मंत्री नवाब मलिक हे बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की,
आपण यापुर्वीही नळदुर्गकराना मत मागितले. आणि येथिल जनतेनी पालिकेची सत्ता दिली.‌ गावात राहणाऱ्यानाच खरी समस्यांची जाण असते.अडचणी  प्राधान्याने सोडवुन शहराचा विकास करणा-या उमेदवाराना विजयी करुन पालिकेची सत्ता देण्याचे सांगुन तुमच्या समस्या ,अडचणी बरोबरच विकासाची गंगा नळदुर्ग शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून साकारेल असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.

प्रचारक शफी शेख (राष्ट्रवादी अल्पसंख्याक) यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, शहराचा विकास करण्याच्या तळमळीने मी निवडणुकीत थांबलो नाही. किंवा पक्षाकडे तिकीट मागितले नाही, मला राजकारण पेक्षा निःस्वार्थ समाजकारण करण्याची आवड आहे. पालिकेतील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज घडीला शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.सर्वत्र घाण, कचरा, रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.आजही शहरात नीट रस्ते, गटारी नाही, १०, १० दिवस पाणी पुरवठा होत नाही. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे.साधे प्रमाणपत्रासाठी नागरिकांना वेठीस धरले जात आरोप करीत भावनिक साद घालत राष्ट्रवादीला एक हाती सत्ता देण्याचे आवाहन करत शहराचे बकाल झालेले चित्र बदलुन दाखविणार असे सांगितले.

यावेळी  संजय बताले यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अजित जुनोदी,अँड आनंद बताले, मुश्ताक कुरेशी, बबलु इनामदार, मिनाज इनामदार, मनोज राजमाने, रमेश फिस्के, रवी महाराज राठोड, प्रमोद कुलकर्णी, अजहर जाहगीरदार ,आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
 
Top