रोटरीच्या वतीने किसान दिनानिमित्त किसानांचा सत्कार 

मुरूम,दि.२४: 

रोटरी क्लब मुरूमच्या वतीने किसान दिनाचे औचित्य साधून प्रगतशील शेतकरी त्याचबरोबर उपक्रमशील शेतकरी संजय मिनियार, मुरूम , अमर पवार भुयार चिंचोली, नितीन शेळके मुरूम, दयानंद व्हनाळे मुरूम यांचा सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ.आप्पासाहेब सूर्यवंशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र कृषी सेवा केंद्राचे आप्पासाहेब पाटील, व्यंकटेश सुपर मार्केटचे विष्णुदास मुंदडा उपस्थित होते. प्रगतशील आणि उपक्रमशील शेतकऱ्यांचा सत्कार हा नव्या पिढीतील युवकांना नक्कीच मार्गदर्शक ठरणार असून त्यांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा आणि त्यातून नव युवकांना प्रेरणा मिळावी हा मुख्य उद्देश रोटरी क्लब आहे,असे प्रमुख अतिथी  अप्पासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन असे अनेक व्यवसाय आपल्याला करता येतात त्याचबरोबर आम्ही आज जवळपास 200 लिटर दूध रोज विकतो त्यातून मला बराच फायदा झालेला आहे असे संजय मिनीयार आणि ॲड अमर पवार यांनी व्यक्त केले
अध्यक्षीय समारोपात बोलताना प्रा डॉ आप्पासाहेब सूर्यवंशी म्हणाले आजचा युवक हा बेरोजगार झालेला असून त्यांना शेती व्यवसायामध्ये आवड निर्माण करण्याचे काम आपल्या माध्यमातून व्हावे हाच उद्देश ठेवून रोटरी क्लब मुरूमने प्रगतशील आणि उपक्रमशील शेतकऱ्यांचा गौरव या ठिकाणी केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले तर आभार सुनील राठोड यांनी मानले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण पाताळे, गोविंद पाटील यांनी परिश्रम घेतले. 
या कार्यक्रमासाठी डॉ.नितीन डागा, राजेंद्र वाकडे, कलया स्वामी, शिवकुमार स्वामी उपस्थित होते
 
Top