नळदुर्ग नगरपालिकेत आज शहर पर्यटन वाढीसाठी पंचवार्षिक आराखडा तयार करण्याच्या विषयांसह विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन
नळदुर्ग,दि.१२:
नळदुर्ग नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवार दि. 12/02/2026 रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असुन यावेळी विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
1. शासकिय पत्रकाचे वाचन करून नोंद घेणे बाबत.
2. नळदुर्ग शहर पर्यटन वाढीसाठी पंचवार्षिक आराखडा तयार करणे व अंमलबजावणीबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
3. श्री क्षेत्र मैलारपूर खंडोबा यात्रा करीता शासनाकडे यात्रा अनुदान मिळणेसाठी मागणी प्रस्ताव पाठविणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
4. दिनांक-08 मार्च, 2026 महिला दिन साजरा करणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
5. बाजार लाईन येथे महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधकाम करणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
6. नळदुर्ग शहरातील अर्धवट स्थितीतील विकास कामांना मुदतवाढ देणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
7. नविन विकास कामे प्रस्तावित करणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
8. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढीसाठी विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
9. दुबार व्यावसायिक नळ कनेक्शन, पाणीपट्टी, शाळा, धार्मिक यांना नळ जोडणी बाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
10. रहिमनगर, दुर्गानगर, वसंतनगर, शितलनगर, येथे विद्युत पोलसह पथदिवे बसविणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
11. वार्षिक निविदा प्रक्रिया राबविणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
12. नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचारी यांना नियमानुसार पदोन्नती देणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
13. नगरपरिषदेचा आकृतीबंध सुधारित करुन घेणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
14. जुन्या जन्म मृत्यु नोंद CRS पोर्टलवर ऑनलाईन करणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणेबाबत.
15. शहरातील विविध ठिकाणी वॉलव्ह दुरुस्ती व चेंबर बांधणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणेबाबत.
16. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार शेल्टर होम तयार करणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.
17. ऐनवेळीचे विषय अध्यक्ष यांच्या परवानगीने, आदी विषयांवर चर्चा होणार आहे.