नगरपालिकेच्या  पहिल्या सर्वसाधारण सभेपुर्वी  काँग्रेसच्या  नगरसेवकांनी  शहर स्वच्छतेसह विविध प्रश्नांवर  निदर्शने केले आंदोलन 

नळदुर्ग,दि.१३ : 

शहर स्वच्छतेसह विविध  प्रश्नावरून काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक होत गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी  सकाळी साडे दहा वाजता नगरपालिकेच्या  प्रवेशद्वारवर जोरदार निदर्शने करत घनकच-यांचे टेंडर रद्द करा, संबंधित ठेकेदार व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या  मागणीसाठी आंदोलन केले. सदरील आंदोलन  सर्वसाधारण सभेपुर्वी  काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी केल्याने पालिकेतील सत्ताधारी भाजप -शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे.

  
गुरुवारी  पालिकेत नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या अध्यक्षतेखाली विविध १६ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेदहा वाजता कार्यालयाबाहेर काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे, उपगटनेते आकाश कुलकर्णी, नगरसेवक इमाम शेख, सुधीर पोतदार,  अ. गफूर कुरेशी
नगरसेविका सौ.अपर्णाताई बेडगे,  कमल गायकवाड, मन्नाबी कुरेशी, मदीना बागवान  झुलेखां इनामदार आदीनी एकत्र येत स्वच्छतेचा प्रश्न, घनकचरा निर्मुलनासाठी नियुक्त कंपनीचे टेंडर रद्द करण्याची मागणी, बंद असलेले आरओ प्लांट सुरू करणे, दर्जाहीन काम करणाऱ्यांवर कारवाई,  पथदिवे चालु करण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली.


 
Top