नळदुर्ग: बालाघाट महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी डॉ अरविंद हंगरगेकर व कवी डॉ. हुजरे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात जेष्ट कवी वि. वा. शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज ) यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
या प्रसंगी कवी हंगरगेकर व कवी हुजरे यांनी कविता सादर करून मराठी भाषा ही किती समृद्ध आहे याची जाणीव करून दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ दयानंद भोवाळ यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील डॉ. दयानंद भोवाळ, डॉ.जयश्री घोडके डॉ. दादासाहेब जाधव, प्रा.बाळू दराडे डॉ. संतोष पवार यांनी कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमास कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अशोक कदम नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके,गणित विभाग प्रमुख डॉ एन. बी. जाधव, मराठी विभागाचे डॉ. लक्ष्मण थिटे,प्रा. काळे, प्रा. कु.जाधव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ लक्ष्मण थिटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ संतोष पवार यांनी मानले.