नळदुर्ग येथील अहिल्यादेवी चौकात भव्य सभामंडप उभरणार - नगराध्यक्ष बसवराज धरणे
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्साहात
नळदुर्ग,दि.३१ : विलास येडगे
नळदुर्ग शहरातील अहिल्यादेवी चौकात अतिशय भव्य असे सभा मंडप उभरण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना सांगितले.
रविवार दि. 31 मे रोजी नळदुर्ग शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी नळदुर्ग बसस्थानकात भीमाशंकर बताले यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याठिकाणी वाहतुक नियंत्रक महेश डुकरे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्याचबरोबर नगरपालिका कार्यालयातही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याठिकाणी नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
जयंतीचा मुख्य कार्यक्रम नळदुर्ग येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पार पडला.याठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पुजन नगराध्यक्ष बसवराज धरणे आणि नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक दत्तात्रय दासकर, तानाजी जाधव, सुधीर पोतदार, ॲड. अरविंद बेडगे,माजी नगरसेवक सुधीर हजारे, विनायक अहंकारी, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, मनसेचे जिल्हा सरचिटणीस ज्योतिबा येडगे,भोई समाजाचे शहर अध्यक्ष सुनिल उकंडे, शहर ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष मुकुंद नाईक, भाजपचे बबन चौधरी, धिमाजी घुगे, पप्पु पाटील,उत्तम बनजगोळे, भगवंत सुरवसे आदीजण उपस्थित होते.
यावेळी बोलतांना नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी म्हटले की, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अतिशय महान आणि समजपयोगी आहे. आज त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याची गरज आहे. देशातील सर्व हिंदु मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे काम अहिल्यादेवीनी केले आहे.त्याचबरोबर विहिरी व घाट बांधण्याचे कामासह धार्मिक व पर्यावरणा संदर्भातही मोठे काम केले आहे.समितीने केलेल्या मागणीनुसार येत्या एक वर्षात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात एक भव्य आणि अहिल्यादेवींच्या कार्याला शोभेल असे सभामंडप उभारण्याचे काम करणार असल्याचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलतांना माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी म्हटले की, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती प्रत्येक घराघरात साजरी झाली पाहिजे असे त्यांनी म्हटले. यावेळी दत्तात्रय दासकर, मारुती खारवे आणि मुकुंद नाईक यांनीही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार समितीचे ज्ञानेश्वर घोडके यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यावर्ती जन्मोत्सव समितीचे ज्ञानेश्वर घोडके, दयानंद चौरे, पद्माकर घोडके, प्रभाकर घोडके, मारुती घोडके,गजानन हळदे, सुहास येडगे, विलास येडगे, अमर भाळे यांच्यासह समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.