अहिल्यादेवी जयंतीनिमित्त वृक्षारोपण; भाजपचे युवा नेते राहुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
धाराशिव,दि.०१ :
सोमवार रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त गुळहळळी ता.तुळजापूर येथे "देशभक्ती और समाजसेवा फाउंडेशन नई दिल्ली व राजमाता प्रतिष्ठान" गुळहळळी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देश भक्ति और समाज सेवा फाउंडेशन नई दिल्ली राष्ट्रीय चेअरमन तथा भाजपा युवा नेते राहुल चव्हाण ,सरपंच तानाजी बनछेरे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालाजी पाटील, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सर्जेराव लांडगे, उपाध्यक्ष किरण घोडके,सदस्य प्रशांत घोडके, मारुती लांडगे,अनिकेत घोडके, सचिव आबाजी घोडके, सहसचिव विश्वजित पाटील, शिवराम लांडगे, देविदास घोडके,खंडू हलकंबे,मल्हारी घोडके,मारुती घोडके,संदीप घोडके,संकेत बनछेरे,कृष्णा बनछेरे आदीसह
गावातील इतर मंडळी उपस्थित होते.