मराठा गल्लीत आठ दिवसांपासून नादुरुस्त ट्रॅक्टर-ट्रॉली; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

नळदुर्ग, दि. ११ जुन :  

शहरातील मराठा गल्लीत गेल्या सात ते आठ दिवसांपासून एक नादुरुस्त ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पारायण कट्टयाजवळ थांबलेल्या या ट्रॉलीमध्ये कचरा साचलेला असून त्यातून दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ट्रॉली दीर्घ काळापासून एकाच ठिकाणी उभी असल्यामुळे तिच्यात विविध प्रकारचा कचरा टाकला जात आहे. त्यामुळे अस्वच्छता वाढून माशा व डासांचा उपद्रवही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

 
Top