कर्तव्यनिष्ठ सेवेला मानवंदना; पोलीस समाजाचे खरे आधारस्तंभ : नगराध्यक्ष बसवराज धरणे; सेवानिवृत्त विजयकुमार राठोड यांचा गौरव सोहळा 

नळदुर्ग, दि. ३ जुलै :

"पोलीस दलातील सेवा ही केवळ नोकरी नसून जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या कुटुंबीयांपासून दूर राहून केलेले समर्पण आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र झटणारे पोलीस कर्मचारी हे समाजाचे खरे रक्षक आहेत," असे प्रतिपादन नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी केले.
धाराशिव पोलीस दलातुन ३३ वर्षे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि निष्कलंक सेवा बजावून नळदुर्ग पोलिस ठाणे येथे सेवानिवृत्त झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार राठोड यांच्या सेवागौरव सोहळ्यानिमित्त तसेच त्यांच्या विवाहाच्या २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त राणा कॉम्प्लेक्स येथे आयोजित सत्कार समारंभात धरणे ते बोलत होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष धरणे म्हणाले की, पोलीस कर्मचाऱ्यांचे जीवन अत्यंत जबाबदारीचे असते. रात्रंदिवस ड्युटी, सण-उत्सव आणि कौटुंबिक आनंदाचे क्षण बाजूला ठेवून ते समाजाच्या सुरक्षेसाठी सतत कार्यरत असतात. अशा कठीण सेवेत कोणताही डाग न लागता ३३ वर्षे सेवा पूर्ण करून विजयकुमार राठोड यांनी आदर्श निर्माण केला असून, त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.

कार्यक्रमात भाजपाचे सुशांत  भुमकर, बलदेव ठाकुर, नगरसेवक मारुती खारवे, सुधीर पोतदार, आकाश कुलकर्णी, शिवसेना (उबाठा) जिल्हा उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले,  रिपाइंचे जिल्हा सचिव एस. के. गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राठोड , मारुती घोडके, माजी सरपंच वसंत पवार, 
च्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी ,राठोड यांना शुभेच्छा दिल्या.तर अनेकांनी मनोगत व्यक्त केले असुन राठोड यांचे सुपुत्र  राणाजगजितसिंह राठोड व  कन्या दिपाली राठोड यांनी देखील मनोगत व्यक्त केले. 


यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयकुमार राठोड व त्यांच्या पत्नीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नगरसेवक मारुती खारवे यांनी केले. कार्यक्रमास नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनी उपस्थित होते.


 


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top