आई-वडिलांच्या कष्टातून मिळालेले यश कायम प्रेरणादायी : संकेत शिंदे ; पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते सत्कार
नळदुर्ग, दि. २६ ऑगस्ट :
सोलापूर येथील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संकेत उमाकांत शिंदे यांची पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल नळदुर्ग येथे जाधव परिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते संकेत शिंदे तसेच त्यांचे वडील सेवानिवृत्त प्राध्यापक उमाकांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमास गटनेते तथा नगरसेवक मारुती खारवे, पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक तानाजी जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी संकेत शिंदे यांच्या यशाचे कौतुक केले. “आजच्या तरुणांनी संकेत शिंदे यांचा आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवावे,” असे आवाहन त्यांनी केले.नगरसेवक मारुती खारवे व नगरसेवक तानाजी जाधव यांनीही मनोगत व्यक्त करून संकेत शिंदे यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.
सत्काराला उत्तर देताना पीएसआय संकेत शिंदे यांनी आपल्या यशामागे आई-वडिलांची पुण्याई, त्यांचे कष्ट आणि मार्गदर्शन असल्याचे सांगितले. “आई-वडिलांनी पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सेवानिवृत्त प्राध्यापक उमाकांत शिंदे यांनी मुलाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास श्रीनिवास अहंकारी, सन्नी उमाकांत शिंदे, रमेश जाधव, उमेश जाधव, संतोष वाले, सुहास पुराणिक, मुकुंद भूमकर, बंडाप्पा कसेकर, प्रदीप ग्रामोपाध्ये, सन्नी भूमकर, संतोष नाईक, भावेश जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी मानले.