Tuesday, 11 September 2012

नळदुर्गचा स्फोाटक गोदाम असुरक्षित


नळदुर्ग - देशासह महाराष्‍ट्रात अतिरेकी कारवाया आणि दहशतवादाने दिवसेंदिवस थैमान घातले आहे. नुकतेच पोलिसानी पकडलेल्‍या दहशतवादीपैकी काही दहशतवादी देशातील अति महत्‍त्‍वाचे व्‍यक्‍ती, अणू प्रकल्‍पासह महत्‍त्‍वाच्‍या ठिकाणावर हल्‍ला करण्‍याची दहशतवादयाची योजना उघडकीस आली असून त्‍यातील काही अतिरेकी मराठवाडयातील असल्‍याचे उघडकीस आले आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर नळदुर्ग (जि. उस्‍मानाबाद) शहरालगत दक्षिण दिशेला असलेल्‍या स्‍फोटक गोदामातील स्‍फोटकाचा माल जिल्‍हयातील विविध पोलीस ठाण्‍यांतर्गत गुन्‍हयातील असून तो गेल्‍या अनेक दशकापासून या इमारतीत आहे. हा गोदाम सध्‍या जीर्ण्‍ व धोकादायक बनले असून असुरक्षित असल्‍याचे उघडकीस आले आहे. त्‍याचबरोबर गोडावून भोवती असलेली संरक्षण भिंत पडली आहे. पोलिस खाते व पाटबंधारे खात्‍याच्‍या वादात हा गोदाम अनेक समस्‍याच्‍या विळख्‍यात सापडले असून गोदामाच्‍या सुरक्षितेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
पन्‍नास वर्षापूर्वी नळदुर्ग येथील कुरनूर (बोरी धरण) मध्‍यम प्रकल्‍पाचे बांधकाम करण्‍यात आले. बांधकामासाठी लागणारे साहित्‍य नळदुर्ग शहराच्‍या पश्चिम दिशेला निर्जन स्‍थळाच्‍या ठिकाणी एक इमारत बांधून त्‍यात ठेवण्‍यात येत होते. त्‍यानंतर गोदाम वजा इमारत रिकामी झाल्‍याने उस्‍मानाबाद जिल्‍हयातील पोलिसांनी जप्‍त केलेल्‍या गुन्‍हयातील जिलेटीन, डीटोनेटार असे स्‍फोटकाचा माल या गोदामामध्‍ये ठेवण्‍यात आले. त्‍यानंतर जस्‍जसे गुन्‍हयाचा निकाल न्‍यायालयात लागतो त्‍याप्रमाणे सदरील स्‍फोटकाचा नाश (निकामी) केले जात असल्‍याचे सांगितले जाते. स्‍फोटकाचा साठ नाश करण्‍यासाठी दिल्‍ली, मुंबई येथून एक्‍सपोलस्‍यु विभागाचे पथक नळदुर्ग येथे येवून गोदामातील त्‍या त्‍या गुन्‍हयातील स्‍फोटक माल नष्‍ट करुन जात असल्‍याची माहिती सुञाकडून मिळाली. सध्‍या या स्‍फोटक गोदामाच्‍या संरक्षणासाठी उस्‍मानाबाद पोलीस मुख्‍यालयातील दोन सुरक्षा गार्ड व पाटबंधारे खात्‍याचा एक वॅचमन असे सुक्षा बंदोबस्‍त कामी आहेत. याठिकाणी गार्ड व वॉचमनास पाऊस, ऊन, थंडी, वारा यापासून बचाव करण्‍यासाठी कक्ष नाही. जे आहे ते जीर्ण व अखेरची घटका मोजत आहे. त्‍याचबरोबर राञीच्‍या वेळी कोणीही याठिकाणी सु‍रक्षितेच्‍या दृष्‍टीने नसल्‍याचे समजते.
सदरील स्‍फोटकाचा साठा या इमारतीत ठेवण्‍यास धोकादायक असल्‍याचे व गोदाम असुरक्षित असल्‍याची माहिती पोलिसानी यापूर्वी वरिष्‍ठांना वेळोवेळी कळविल्‍याचे समजते. हा गोदाम नळदुर्ग पोलीस ठाण्‍यांतर्गत असून जिल्‍हयातील भूम, परंडा, कळंब, उमरगा यासह इतर पोलीस ठाण्‍यांतर्गत स्‍फोटक गुन्‍हयातील जप्‍त केलेला माल या ठिकाणी ठेवण्‍यात आले आहे. माञ उपविभागीय पाटबंधारे तुरोरी मध्‍यम प्रकल्‍प विभाग उमरगा या कार्यालयाच्‍या ताब्‍यात हा गोदाम आहे. कार्यालयात कर्मचा-यांची संख्‍या अपुरी असून एक कर्मचारी गोदामाला पहारा देण्‍यासाठी अडकला आहे. त्‍याचबरोबर गोदामातील स्‍फोटकाचा साठा पोलीस खात्‍याचे असून सुरक्षितेच्‍या दृष्‍टीने पोलीस खात्‍यानेच ताब्‍यात घेण्‍याची विनंती या कार्यालयाच्‍यावतीने जिल्‍हा पोलीस अधिक्षकाना वेळोवेळी पञाद्वारे करण्‍यात आली आहे. याप्रकरणी पाटबंधारे विभागाचे उप‍अभियंता के.बी. शिवपूजे यांच्‍याशी भ्रमणध्‍वनीद्वारे संपर्क केले असता त्‍यानी आपणास या संदर्भात काहीच माहिती नाही, असे उडवाउडवीचे उत्‍तर देवून बोलण्‍याचे टाळले. भांडारपाल डी.टी. शिंदे यांनी सांगितले की, जीर्ण झालेल्‍या इमारतीची दुरूस्‍ती करण्‍यासाठी व संरक्षण भिंत बांधकामासाठी या कार्यालयाकडे निधी उपलब्‍ध नसल्‍याने आम्‍हाला काम करता येत नाही. त्‍याचबरोबर गोदामास पावसाळयास गळती लागून पाणी साचत असल्‍याने इमारत सुरक्षित राहिली नाही.
गेल्‍या अनेक वर्षापासून शासनाच्‍या ताब्‍यात असलेला स्‍फोटक साठा (दारू गोळा) ब-याच काळापासून साठा असून तो सुरक्षितता कामी नळदुर्ग येथील स्‍फोटक गोडावूनमध्‍ये ठेवण्‍यात आला आहे. परंतु तो असुरक्षित असल्‍याचे दिसून येत आहे. सध्‍या महाराष्‍ट्रासह देशामध्‍ये अतिरेकी कारवाया, दहशतवाद असे गंभीर प्रकरणे घडत असून सदरील स्‍फोटक साठा असुरक्षित असल्‍याने धोका निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. स्‍फोटक गोदावून नळदुर्ग शहरातील वसाहत जवळच असल्‍याने याच गंभीर परिणाम भविष्‍यात होण्‍याची शक्‍यता नागरिकांतून वर्तविली जात आहे. त्‍याकरिता स्‍फोटक गोडावूनच्‍या ठिकाणी पुरेसे असे संरक्षण नसल्‍याचे दिसून आले. याची शासनाने गंभीर दखल घ्‍यावी, त्‍याचबरोबर गोदामाच्‍या सभोतालाची संरक्षण भिंत पडून अनेक वर्ष झाले. माञ संबंधित खात्‍याने याकडे दुर्लक्ष केल्‍याने ही इमारत अखेरची घटका मोजत असल्‍याचे दिसून येत आहे. ही इमारत आज नळदुर्ग येथील रहिवासी विभागात आहे.
याप्रकरणी जिल्‍हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्‍याशी संपर्क साधले असता त्‍यानी सांगितले, हा गेादाम पाटबंधारे खात्‍याच्‍या ताब्‍यात असून त्‍याची देखभाल त्‍यांच्‍याकडे आहे. तसेच इमारतीची डागडुजी करणे त्‍यांचेच काम आहे. सदरील गोदामाची संरक्षण भिंत पडल्‍याचे व इतर समस्‍याबाबत वरिष्‍ठांना अहवाल पाठविल्‍याचे त्‍यानी सांगितले.

Labels: