Sunday, 23 September 2012

रिपाइंमध्ये बंजारा कार्यकर्त्यांचा प्रवेश

वागदरी - येडोळा (ता. तुळजापूर) येथील बंजारा समाजाचे कार्यकर्ते धोंडीबा राठोड यासह महिला व पुरूष कार्यकर्त्‍यांनी रामदास आठवले यांच्‍या नेतृत्‍वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. नळदुर्ग येथे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात बंजारा समाजाचे धोंडीबा राठोड, ग्रामपंचायत सदस्‍य मंगल राठोड, यदू जाधव, सेवा आडे, राजेंद्र राठोड, तारू पवार यासह असंख्‍य बंजारा कार्यकर्त्‍यांनी प्रवेश केला आहे. यावेळी तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, जिल्‍हा सरचिटणीस तानाजी कदम, अरूण लोखंडे, राजा लोंढे, बाबासाहेब बनसोडे, अरूण कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Labels: