सांगोला (राजेंद्र यादव) : परीट समाजाचा आठवा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा दि. 21 एप्रिल रोजी पुणे येथील हॉटेल सेंट्रल पार्क, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना येथे आयोजित केल्याची माहिती जिल्हा प्रसिध्दीप्रमुख राजेंद्र यादव यांनी दिली.
      दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी परीट समाजातील वधू-वर तसेच पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याचे उद्घाटन पुण्याच्या रुपी बँकेचे अध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून थोर विचारवंत हरी नरके, माजी उपमहापौर सुरेश नाशिककर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबरच राष्ट्रीय उपाध्यक्ष तुकाराम दळवी, वधूवर मंडळाच्या संचालिका विमल खंडाळे, दै. ग्रामस्थचे संपादक किसनराव जोर्वेकर, माजी नगरसेवक माऊली यादव, उद्योजक बाबासाहेब जाधव, डॉ. समीर ननावरे, उद्योजक रमाकांत कदम, उद्योजक प्रताप पवार, प्रदेशाध्यक्ष एकनाथ बोरसे, उद्योजक देवेन सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
     या मेळाव्यासाठी उपस्थित राहू इच्छिणार्‍या वधू-वरांनी त्यांचा अलिकडे काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो, पत्रिका व संपूर्ण माहिती आणावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
 
Top