नळदुर्ग  : तुळजापूर तालुक्‍यातील शिरगापूर येथील जिल्‍हापरिषद प्राथमिक शाळेच्‍यावतीने पशु-पक्ष्‍यांसाठी पाण्‍याची सोय करण्‍यात आली आहे. त्‍यासाठी हौद व कुंडा ठिकठिकाणी ठेवण्‍यात आल्‍या आहेत. टंचाईग्रस्‍त योजनेंतर्गत मुख्‍यकार्यकारी अधिकारी व शिक्षक संघटनेने केलेल्‍या आवाहनानुसार शिरगापूर येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी प्रत्‍येकी हजार रुपये याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये गोळा करुन गावात जनावरांसाठी पाण्‍याचे हौद व पक्ष्‍यासाठी पाण्‍याची कुंडयाची सोय करण्‍यात आली आहे. येथील शेतकरी भिकाजी जाधव हे या हौद व कुंड्यामध्‍ये पाणी सोडत असतात. त्‍यामुळे पशु-पक्ष्‍यांची सोय झाली आहे.     या कार्यासाठी शाळेचे मुख्‍याध्‍यापक, स‍हशिक्षक म्‍हेत्रे, सुर्यवंशी, साळुंके आदीनी पुढाकार घेतला होता.
 
Top