उस्मानाबाद :- नागरी हक्क संरक्षण कायदा व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत जिल्हयात 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीत 54 गुन्हे दाखल झाले होते.
      जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. शिंदे, सहाययक संचालक सरकारी अभियोक्ता एस. पी. चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती.
          सहायक  आयुक्त, समाज कल्याण विभाग यांनी यावेळी आढावा सादर केला. जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी यावेळी अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत घडलेले गुन्हे, पोलीस तपासावरील गुन्हे, अत्याचार पीडितांना दयावयाचे अर्थसहाय्य  आदींचा आढावा घेतला. प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याच्यादृष्टीने तपास प्रक्रिया गतीमान करावी, अशा सूचना त्यांनी संबधित यंत्रणेला दिल्या.
 
Top