उस्मानाबाद :- उजनी पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निधी तात्काळ मंजूर केला आणि तातडीने तो दिलाही, त्यामुळे उजनीचे काम तातडीने पुर्ण झाले आणि उस्मानाबादकरांसाठी तेरणा जलशुध्दीकरण केंद्रात पाणी दाखल झाले. मी विधानसभेत सोमवारी पाणी उस्मानाबादकरांना मिळणार, असे जाहिर केले होते.  मात्र 2 दिवस आधीच पाणी आले आहे. लवकरच ते उस्मानाबादकरांना मिळेल, आम्ही बोलतो ते करुन दाखवितो. अशी प्रतिक्रिया जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली. उस्मानाबादकरांच्या आनंदात संपूर्ण जिल्हाही सहभागी असल्याचे त्यांनी  आवर्जून सांगितले.
      तेरणा जलशुध्दीकरण प्रकल्पास त्यांनी भेट देवून तेथे पाहणी केली. त्यानंतर उस्मानाबादकरांसाठी अतिशय महत्वाच्या  असणा-या या योजनेविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे ही योजना पुर्णत्वास आल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.
    यावेळी खासदार पद्मसिंह पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिष्देचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, विश्वास शिंदे,लक्ष्मण सरडे,  बाळासाहेब पाटील,मधुकर तावडे,बाळासाहेब शिंदे, आदि लोकप्रतिनिधी व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top