बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी तालुका कॉंग्रेस कमिटीच्‍या नावाने आयोजित केलेल्‍या निराधार निराश्रीत दुर्बल घटकांच्‍या मेळाव्‍यात सामाजिक न्‍यायमंत्री शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती होती. मात्र सदरच्‍या कार्यक्रमावर स्‍थानिक कॉंग्रेसच्‍या राजकीय पुढा-यांची अनुपस्थिती होती. सदरच्‍या कार्यक्रमांसाठी महिलांची संख्‍या सुमारे दोन हजारांच्‍या जवळपास होती. मात्र मंत्री महोदयांसाठी त्‍यांना चार-पाच तासांची वाट ताटकळत बसावे लागले. दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर हार, तुरे, फेटे यांना टाळले गेले असले तरी बार्शी शहर तालुक्‍यात ज्‍यांच्‍यामुळे कॉंग्रेसला सोनियाचे दिवस आले त्‍या नेत्‍यांशी चर्चा करण्‍यात, विश्‍वासात घेण्‍यात आयोजकांचे आलेले अपयश जाणीवपूर्वक दिसून आले.
    कै. लताताई सकट यांच्‍या जयंतीनिमित्‍त सामाजिक कार्यकर्त्‍या सुनिता जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर ना.मोघे बार्शीतील बुरुड समाजाच्‍या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी गेले. त्‍याठिकाणी मात्र चित्र वेगळेच दिसून आले. आ. दिलीप सोलप व त्‍यांचे विरोधक राजेंद्र राऊत यांना शेजारी शेजारी बसण्‍याचा योग मोघे यांच्‍या उपस्थितीत दिसून आला. काही काळ इकडे तिकडे चळबळ करीत शेवटी कार्यक्रमाची सांगता झाल्‍यावर झटपट निसटन दोघांनी सुटकेचा श्‍वास सोडला.
 
Top