भैरवनाथ कानडे
उस्‍मानाबाद : चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील सहशिक्षक भैरवनाथ कानडे यांची  बामसेफ या बहुजन कर्मचारी संघटनेच्‍या उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली आहे.
    बामसेफचे राज्‍य उपाध्‍यक्ष एम.बी. मगरे, एस.एम. थोरे औरंगाबाद यांच्‍या प्रमुख उपस्थितीत उस्‍मानाबाद येथे झालेल्‍या बैठकीत भैरवनाथ कानडे यांची जिल्‍हाध्‍यक्ष म्‍हणून तर महासचिवपदी प्रा.आर.एस.गजभिये यांची एकमताने निवड करण्‍यात आली. नुकत्‍याच पार पडलेल्‍या बामसेफच्‍या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी डी.एस. सुरवसे हे होते.
    भैरवनाथ कानडे हे चिकुंद्रा येथील श्री भैरवनाथ माध्‍यमिक विद्यालयात सहशिक्षक म्‍हणून कार्यरत असून त्‍यांनी केलेल्‍या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्‍या उल्‍लेखनीय कार्याची दखल घेऊन त्‍यांची अध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली आहे.
    यावेळी निवडण्‍यात आलेली उस्‍मानाबाद जिल्‍हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे : उपाध्‍यक्ष एम.ए. कांबळे, सुनिल कांबळे, सहसचिव प्रा. एस.ए. अंकुश, संघटक सिद्राम साखरे, कोषाध्‍यक्ष बी.जे. शिंदे, सहसंघटक प्रा.व्‍ही.के. स्‍वामी, सदस्‍य डी.ए. सुरवसे, एम.जी. पवार, आर.डी. अंगरखे, वसंत आवटे, आर.व्‍ही. गरड, बळीराम राठोड, आर.जी. शेख, जब्‍बार शेख, सुदेश माळाळे, माधव ममदे, व्‍ही.जे. वाघमारे, धनंजय बनसोडे, महादेव भोसले आदींचा समावेश आहे.
 
Top